डायट अंड लाइफस्टाईल – मराठी आवृत्ती वितरण, उपलब्धता , व माहिती

डायट अन्ड लाइफस्टाइल  फॉर हेल्थ इन द ट्वेंटीफर्स्ट सेन्चुरी: ए सेल्फ- एमपोवेरमेन्ट गाईड – वितरण – बलिप्रतिपदा, २७ ऑक्टोबर , २०११.

लेखक : डॉ. शांताराम काणे    अनुवादक: सौ. सुनीति काणे

उपलब्धता

लेखक: ०२०-२५६७ २८३३/०२०-२४६७ ६१६०;   sgkane@gmail.com and https://katonics.co.in

प्रकाशक: ए.पी.के. पब्लिशरस: www.apkpublishers.com

पुणे: पॉप्युलर

पुस्तकासंबंधी : प्रकृतीच्या दैनंदिन तक्रारी व दीर्घकालीन दुखण्यांची सुरुवात यांपासून सुरक्षित राहाणे आणि आजारानंतर प्रकृती पूर्ववत करता येणे यासाठी आहार व जीवनशैली आखण्यासाठी वाचकाला सक्षम करणे, हा या पुस्तकामागचा हेतु आहे. हे सक्षमीकरण शक्य होण्यासाठी आवश्यक अशी अनेक विषयांवरची माहिती ह्या पुस्तकात विस्तृत स्वरुपात दिलेली आहे आणि ही माहिती पद्धतशीरपणे वापरून आपला आहार कसा आखावा हे सोदाहरण दाखवलं आहे. ह्या पुस्तकात साध्यासुध्या व्यवहारातल्या संकल्पना मांडल्या आहेत.

  • आरोग्याविषयी माहिती एकत्र करणे.
  • एका दृष्टीक्षेपात अंदाज येईल असे साधे तक्ते बनवायला व वापरायला शिकणे.
  • हिशोब व अंदाज यांच्या वापरण्यास सुलभ अशा पद्धती शिकणे.
  • वजन मापानिशी आहार आखायला शिकणे.
  • कोणत्याही टोकाची धोरणे न वापरता संतुलन साधण्यासाठी काय करावं व काय करू नये याबद्दल सर्वंकष दृष्टीकोन ठेवणे.
  • पुराव्याचा योग्य उपयोग करून व दुरुपयोग टाळून धोरण आखणे.

थोडक्यात म्हणजेतुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या स्वाथ्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल !

लेखकाविषयी: डॉ. शांताराम काणे केमिकॅल इंजिनिअर आहेत. त्यांनी मुंबई आय.आय.टी. मधून बी. टेक. ची पदवी आणि एम.आय.टी., केम्ब्रिज, यु.एस.ए. येथून एम.एस. व डॉक्टरेट ,मिळवली. सव्वीस वर्ष त्यांनी पेट्रोकेमिकल्स, अग्रोकेमिकल्स आणि फाईन केमिकल्स यांच्या संशोधन व तंत्रज्ञानाच्या व्यवस्थापनाची उच्च पदे विविध कंपन्यात सांभाळली. ते मुंबई आय.आय.टी. येथे २००१ पासून अद्जांक्त प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत व ‘भस्म आणि होमिओपथि’ यांवर तिथे त्यांचे विशेष संशोधन सुरु आहे.

१९८३ सालापासून त्यांनी छंद म्हणून आयुर्वेद अभ्यासला आहे. अति सूक्ष्म मात्रेत उपयुक्त ठरतील असे खाद्यातेलातले वनस्पतींचे अर्क बनवण्याची पद्धत त्यांनी शोधून काढली असून, स्वेच्छेने मदत करणाऱया अनेकांच्या सहकार्याने त्यांनी ह्या अर्कांचे विविध उपयोग शोधून काढले आहेत. हे कार्य करतानाच स्वास्थ्यासाठी योग्य आहार व जीवनशैली किती महत्वाची आहे याची तीव्रतेने जाणीव होऊन त्यावर त्यांनी सखोल अभ्यास केला. हे पुस्तक त्याचाच परिपाक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *